‘आप्पी आमची कलेक्टर’चा प्रोमो प्रदर्शित

झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. शिवानीने ह्या आधी अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतला आहे.

ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि  सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, ” मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका करणार आहे.आणि ही अप्पी प्रेक्षकांना  नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.

ह्या मालिकेची निर्मिती केली आहे वज्र प्रोडक्शनने. ह्या आधी वज्र प्रोडक्शनच्या झी मराठीवर ‘लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणुस २’ ह्या मालिका गाजल्या आहेत. त्यामुळे ह्या ही मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: