May 2, 2024

planetmarathimagazine

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित,  चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ ‘ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या...
सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘तुमची मुलगी काय करते?’. चित्तथरारक असणाऱ्या ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेमध्ये सध्या किलवरचा शोध सुरू आहे. मागील 200 भागांमध्ये ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत सावनी मिरजकर नावाची तरुणी बेपत्ता होते. त्यानंतर सुरू होते श्रद्धा मिरजकर म्हणजे तिच्या आईच्या शोधाची गोष्ट. श्रद्धा  जिवाचं रान करत सावनीला शोधून काढते. अनेक वेळा तिच्या आवाक्याबाहेर जाऊन ती गोष्टी करते. ड्रग डील करते, बंदूक हातात घेते अशा अनेक गोष्टी सावनीला शोधण्यासाठी श्रद्धा करते. अखेर अथक प्रयत्नांनंतर सावनीला शोधून काढण्यात श्रद्धा यशस्वी होते. सावनी घरी अली, तरी तिच्या मनावर झालेले आघात अजूनही पुसलेले नाहीत. अशातच इन्स्पेक्टर विजय भोसलेला किलवर जिवंत असल्याचे समजते. त्यामुळे आता सगळे  किलवरला शोधताहेत. सावनीही या कामात पोलिसांना मदत करते आहे. त्यामुळे येत्या भागांत अनेक रहस्यं उलगडली जातील. तसेच चारू किलवर असेल का, सावनीला तिचा भूतकाळ आठवेल का, मिरजकर कुटुंबाची या सगळ्यातून सुटका होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळतील.
झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने...
राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली असून अरविंद...
‘झी मराठी’वरील ‘तू तेव्हा तशी’ या या मालिकेतील अनामिका व सौरभ यांची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे.या दोघांचे प्रेम फुलत असताना निल आणि राधा यांचे प्रेमही प्रेक्षकांना भूरळ घालते. यातच आता मालिका एक नविन वळण घेणार आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना...
राधिका हे पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत रमा या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी रमाला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील अनिता प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करणार याची हमी प्रेक्षकांना मिळाली. फ्रेमच्या चौकटीमधली रमा मालिकेत काय रंजक वळण आणणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल पण ही भूमिका साकारणं आव्हानात्मक आहे का याबद्दल बोलताना अनिता म्हणाली, “मी साकारत असलेली रमा ही फोटोफ्रेममधून बोलणार आहे. जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न मी करतेय. फ्रेममधून बोलणं काही अवघड नाही. ते सहज आहे. फक्त इथे देहबोलीतून प्रतिक्रिया देता येत नाही. एका चौकटीत काम करावं लागतंय. अशी भूमिका करणं म्हणजे आव्हानच आहे. कमीत कमी साधनामधून जास्तीत जास्त गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मलाही उत्सुकता आहे की, मी हे कसं साकार करणार आहे .त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे.”
मागील काही दिवसांपासून मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सगळीकडेच ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे....
सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित राजश्री प्रोडक्शनचा साठावा चित्रपट ‘उंचाई’ ११.११.२०२२ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. राजश्री प्रोडक्शनच्या...